मराठी
४१. दोष मी ठेऊ कुणाकुणावर
दोष मी ठेऊ कुणाकुणावर
साथी माझा सोडूनि गेला
साथ अर्ध्यांवर ... ध्रु
कसे मी फेडू ऋण तयाचे
सोने केले माझ्या जीवनाचे
आशा ठेऊ कुणाकुणावर ... १
काय माझ्या जीवनाचे पुढे
आयुष्याला माझ्या गेले तडे
खचुनी गेले तुटला आधार ... २
व्यर्थ हे झाले माझे जीवन
कोरडे रडे माझे नयन
दुःख उचलुनी घेतले खांद्यावर ... ३