मराठी
४२. जगणे मरणे इच्छा प्रभूची
जगणे मरणे इच्छा प्रभूची
काय तुझ्या हाती
मानवा तू केवळ माती ... ध्रु
मी मी म्हणणे व्यर्थ तुझे रे
तुझ्या हातचे काही नसे रे
माया जाळी का बसलासी
व्यर्थ जगी नाती ... १
विचारूनि घे तुझ्या मनाला
शांती मिळाली का जीवनाला
नसे भरोसा कधी अचानक
विझेल हि ज्योती ... २
जगता मधुनी जाईल मूर्ती
जाईल मूर्ती पण राहील कीर्ती
अमर यापुढे राहील जागती
फक्त तुझी प्रीती ... ३