मराठी
४४. प्रेषितांन्नो कार्य करा रे
प्रेषितांन्नो कार्य करा रे
सर्व भूस्थळी
जय ख्रिस्त नामाची द्या
गोड आरोळी ... ध्रु
भाव भावांमध्ये नको रे भांडण
काइनाने हाबेलाचा केला हो खून
जन्म नका वाया घालू मानव कुळी ... १
शास्त्र लेख रोपाची त्या करा पेरणी
फुला फळाने हे झाड बहृदया तरी
काढूनच टाका प्रियानो कुवत कुळी ... २
बारा प्रेषितांचे पाय धुतो प्रभू राज
लिन पानाचे हे मर्म सांगे जगतास
आता तरी एक व्हा रे,
ख्रिस्ता मध्ये एक व्हा रे भावना मनी ... ३