मराठी
४७. शेवटचे पाणी पाज मला
हाक मारुनी जवळ घेऊनि
एक माझ्या मुला
शेवटचे पाणी पाज मला ... ध्रु
दुखवू नको कधी आपल्या आईला
जीव लाव बहीण भावाला
कुटुंब हे आपले तुझ्याअ रे हाती
मी तर नाही आता तुझ्या रे सोबती
माझी विनंती आहे तुला ... १
दुःखाचे ओझे आले कुटुंबावर
कष्टाचे ओझे घे तुझ्या पाठीवर
मी जे कमविले हाती तुझ्या केले
दुःखाने अंतःकरण करू नको ओले
विसरू नको तू कर्तव्य तुझे .. २
प्रभूचा हा दिवस येणारच होता
मला तो घेऊन जाणारच होता
कठीण हा दिवस अडविल कोण
जीवन हे एकदाच मिळते ... ३