४८. रून झुन पायल बाजे

मराठी

४८. रून झुन पायल बाजे रून झुन रून झुन पायल बाजे पायी तुझ्या चाळा निज निज बाळा नको वाजवू रे खुळखुळा .. ध्रु रानामध्ये मेषपाल हे हर्ष भरे हो हर्ष भरे मिळुनी सगळे रान मेंढरे प्रभू कडे धावली बाळ दर्शनाला मे धरणी हि लाजली ... १ _______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________ ४९. दुःख माझे जाणुनी घे रे दुःख माझे जाणुनी घे रे सांगतो मी तुला देवराया येशूराया सांगतो मी तुला ... ध्रु नाही कोणी माझ्या सोबती कसली नाती गोती नाही एकटा मी रे आता तूच माझ्या सोबती कसले भाऊ कसल्या बहिणी विसरले सारे मला ... १ स्वार्था पायी जीवन व्यर्थ कसं जगावं पुन्हा दिली तू रे मला हि शिक्षा घडला काय गुन्हा अंतःकरण उघडे पडले, दरवाजा झाला खुला ... २ तू लाविली बाग अशी हि माझ्या तू बालपणी नाही कोणी नाही माळी तुझ्या शिवाय कोणी कांट्यावाचून शोभा नाही एकट्या त्या फुला देवराय येशूराया सांगतो मी तुला ... ३