मराठी
५०. कालवारीच्या वाटेवरती
कालवारीच्या वाटेवरती
अजबच काही घडले
खांद्यावरती मरण घेऊनि
जीवन चालत होते ... ध्रु
पायापाशी जे जे बसले
झालेत देव मुले
हात ज्यावर त्याने धरिले
अवघे उद्धरिले
आज परंतु याच भूगोली
अजबच काही दिसते ... १
पाय सपर्शिले ज्या भूमीला
झाली सुवर्ण माती
हात स्पर्शिले ज्या मृतांना
झाले सजीव ते हि
आज परंतु याच भूगोली
अजबच काही दिसते ... २