मराठी
५१. तुझ्या दारी तीष्टुनी गेलो
तुझ्या दारी तीष्टुनी गेलो
पापी मी लाचार देवा
उघड उघड रे दार ... ध्रु
किती मारिल्या तुजला हाका
एकही कानी नच आली का
पातक भारी पाय थरथरे
भोवळ करी बेजार
देवा उघड उघड रे दार ... १
मी तर पापी, मीच सांगतो
दान क्षमेचे तुला मागतो
कोण तुजविण देईल माझ्या
आश्रुंना आधार
देवा उघड उघड रे दार ... २