५२. लाजारचा विरह प्रभो मी

मराठी

५२. लाजारचा विरह प्रभो मी लाजारचा विरह प्रभो मी असाच साहू का बंधू माझा भेटेल का उशीर झाला का बंधू माझा भेटेल का ... ध्रु निरोप तुज केले आ ss वाट बघोनी डोळे शिणले तीन दिवस सगळे जीवपाखरू, उडुनी गेले परत येईल का ... १ होता भाव मणी आ ss निरोप मिळता येशी धावुनी आपुल्या बेथनी आला नच तू गेली विझोनी जीवन ज्योती हि ... २ आलास तू देवा ss पहावयाला अमुच्या भावा कबरेतील शवा, लाजाराचा निष्प्राण जीव हा सजीव करशील का ... ३