५३. देव मोशेस हे बोलला

मराठी

५३. देव मोशेस हे बोलला निवडिलें आहे मी तुला देव मोशेस हे बोलला ... ध्रु अग्निरूपाने दिले दर्शन नमवुनी माथा करितो नमन अग्नीद्वारे प्रभू बोलला ... १ इस्राएलाचा अधिपती होशील कळप हा माझा तू पाहशील मी आहे तुझ्या जोडीला ... २ जड ओठांचा जड जिभेचा असशील जर तू भक्त देवाचा उणे पडणार नाही तुला ... ३