मराठी
54. क्षणात आहे क्षणात नाही
क्षणात आहे क्षणात नाही
जीव असे बापुडा
जीवन हे पाण्याचा बुडबुडा ... ध्रु
माती असशी मातीस मिळशील
उंच मनो रे किती बांधशील
भज मनुजा तू ख्रिस्त प्रभू वरा
तोचि असे रे जीवनी घडा
जीवन हे पाण्याचा बुडबुडा ... १
आयूचा घडा माती समान
जोवरी आहे कुडीत प्राण
भज मनुजा तू ख्रिस्त प्रभू वरा
तोचि असे रे जीवनी घडा
जीवन हे पाण्याचा बुडबुडा ... २