५५. प्रभुजी गुरुजी शोधूनि तुम्हा थकले

मराठी

५५. प्रभुजी गुरुजी शोधूनि तुम्हा थकले प्रभुजी गुरुजी शोधूनि तुम्हा थकले आश्रूंनी नेत्र भरले ... ध्रु मोलाचे तेल आणिले मग सुगंध हा पसरे लावण्या शरीराला मी पहाटेच आले ... १ दुष्टाने तुला छळीले मग खांबी तुला खिळिले गंगोत्र तुझ्यासाठी हळहळूहूनि रडले ... २ कंबरेत तुला ठेविले तेथुनि कोणी नेले मरणास जिंकूनि पुनरिथ प्रभू उठले ... ३