मराठी
56. संकटाची रास झाली
संकटाची रास झाली
केला तुझा धावा
हे प्रभुदेवा, हे प्रभुदेवा ... ध्रु
हाक माझी तुझया रे कानी
नाही का रे आली
मी तर पापी आहे प्रभुजी
काय दशा माझी झाली
तुझ्या दयेचे दार प्रभुजी
तू आता उघडावा ... १
पापी जगामध्ये फिरुनी फिरलो
झाली माझी हार
माझ्या साठी तुझे रे देवा
बंद झाले दार
ठोकूनी थकलो दार तुझे मी
कुठे तुला पहावा ... २
तुझ्या शिवाय मजला कोणी
नाही आता वाली
तुझ्याकडे आलो कष्टी होवुनी
माझी झोळी खाली
दया करा प्रभू माझ्या वरती
संपुनि ताक दुरावा ... ३
--- संतोष .आर. पारधे